विहीण पंगत

ज्याप्रमाणे लग्नामध्ये बाकीच्या सर्व विधींना महत्त्व आहे म्हणजे ज्याच्या मध्ये पाहुण्यांचे स्वागत कन्यादान सप्तपदी रुखवंत हळद बांगड्या भरण्याचा प्रोग्राम तसेच कन्यादान त्याचप्रमाणे विहिणीच्या पंक्तीला तितकेच महत्त्व आहे भारतीय संस्कृती मध्ये विहिणीची पंगत म्हणजे आपल्या मुली कढल्या सासरच्या लोकांच्या पाहुण्यांचे स्पेशली सासुबाईंचे स्वागत आणि त्यांचे पाहुणे मंडळी चे स्वागत केल्या जाते. पंगत म्हणजे मानाची पंगत, मानवईक लोकांची पंगत या नावानेसुद्धा ओळखले जाते म्हणून या पंक्तीला महत्व आहे यामध्ये कारल्याचा वेल मंडपामध्ये लावला जातो त्यानंतर पाकळ्या टाकल्या जातात, नवरी नवरदेव च्या ताटाच्या बाजूला समई लावल्या जाते पाकळ्या सुद्धा टाकल्या जातात आणि एक मान एक मान म्हणून या विणीच्या पंक्तीला जास्त महत्त्व आहे त्याच्यामध्ये पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना हळदी-कुंकू लावून त्यांच्या हाताला चंदनाचा लेप लावला जातो आणि सर्वांना जेवणाला निमंत्रण देऊन ही पंगत बसवली जाते या ला विहिन पंगत असे म्हणतात.