सप्तपदी

ज्यावेळेला वधू आणि वर यांचे लग्न होते मंगलाष्टके होतात त्यानंतर सप्तपदीची ही रस्म म्हणजे विधी केल्या जाते तर या विधीमध्ये ब्राम्हण त्यांच्या साक्षीने आणि मंत्रांनी वधू आणि वर हे दोन्ही एकमेकांना सात वचन देतात हवन कुंड यांच्या भोवताल सात फेरे घेऊन ते आपल्या नवीन जीवनाची सुरवात करत असतात त्या वेळेला वर वधूला मंगळसूत्र घालतो तिच्या भांगात कुंकू हरतो आणि एकमेकांना सात वचन देऊन ते सात जन्मासाठी बांधली जातात अशा या सप्तपदी ला लग्नाचा विधी मध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे या वेळेला हवन कुंडाच्या भोवती रांगोळी टाकली जाते फुलांच्या पाकळ्या घातल्या जातात चौरी सजवल्या जाते आणि वधूचे मुलीचे कन्यादान वडील करतात आणि वधू आणि वर आला आशीर्वाद दिला जातो.