रांगोळी

पहाटेच्या रविकिरण सोबतच दिवसाची सुरुवात करताना अंगणात सडा पाणी शिंपडून दारासमोर उंबरठा, समोर तुळशी, समोर एक छानशी रांगोळी काढल्या जाते पानाफुलांची असो स्वस्तिक ची असो किंवा इतर कुठली डिझाईन असो रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर हळदी-कुंकू टाकलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप जास्त महत्त्व आहे कुठल्याही शुभ प्रसंगाला रांगोळीने सुरुवात केली जाते पाहुण्यांच्या स्वागतासाठी लग्नांमध्ये बारशाला पण तिला तसेच सणावाराला रांगोळी काढण्याची पद्धत आहे मग या रांगोळी मध्ये वेगवेगळे प्रकार आहे कोणी पोस्टर रांगोळी काढत कोणी फ्रीहँड रांगोळी संस्कार भारती रांगोळी ठिपक्यांची रांगोळी डिझाईन फुलांची रांगोळी धान्याची रांगोळी असे वेगवेगळे प्रकार रांगोळीचे आहे प्रत्येक जण हा आपल्या वेळेनुसार आणि आपापल्या आवडीने कलात्मकतेने रांगोळीही काढत असतो अशा या रांगोळीला खूप जास्त महत्त्व आहे रांगोळी दारात काढल्यानंतर मन प्रसन्न होतं घरातील वातावरण छान राहते लक्ष्मीचे आगमन होतात असे म्हणतात आणि दिवस चांगला जातो.