गृह प्रवेश

लग्नानंतर नववधूचे स्वागत घरी करतात मुलाच्या घरी जिचे धुमधडाक्यात स्वागत केले जाते त्याला गृहप्रवेश किंवा गृहा प्रवेश असे म्हणतात यावेळी जी मुलगी लग्न करून आपल्या घरी येते तिला लक्ष्मी मानून तिचे स्वागत अगदी आनंदाने केले जाते ज्याप्रमाणे आपण दिवाळीला लक्ष्मी च्या स्वागतासाठी रांगोळी काढतो दिवे लावतो त्याचप्रमाणे नववधूचे स्वागत करण्यासाठी दारामध्ये छानशी रांगोळी काढली जाते त्यानंतर दिवे लावले जातात अशी फुलांची पायघडी टाकली जाते आणि आज बाजूला दिवे लावून उंबरठ्यावर तांदुळाने भरलेले माप ठेवले जाते आणि माप ओलांडून कुंकवाच्या थाळी मध्ये तिचे पाय बुडवून कुंकवाच्या पायाने लक्ष्मीच्या रूपाने तिचे स्वागत अगदी आनंदाने उत्साहाने केले जाते.