डोहाळे जेवण / Baby shower

लग्नानंतरच जेव्हा नवी नवरी किंवा मुलगी आई होते किंवा तिला आई होण्याची चाहूल लागते ती गर्भवती होते एक छोटासा अंकुर तिच्या गर्भात वाढत असतो हा आनंद तिच्यासाठीच नव्हे तर अख्ख्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा असतो हा आनंद साजरा करण्यासाठी आपण त्या गर्भवतीचे ओटी भरण्याचा कार्यक्रम करत असतो या ओटी भरण्याच्या कार्यक्रमांमध्ये त्यालाच डोहाळेजेवण असेसुद्धा म्हणतात तर डोहाळे जेवण शक्यतो सातव्या महिन्या मध्ये किंवा नव्या महिन्यामध्ये केले जाते सातव्या महिन्याचा या कार्यक्रमांमध्ये तिची खणानारळाने ओटी भरली जाते तिला फळ दिले जातात तिला काय खावं असं वाटतं हे विचारून तिची हाऊस माऊस पुरवली जाते हिरवी साडी तिला दिली जाते हिरव्या बांगड्या त्यानंतर हिरव्या पाळणा सजवला जातो पाळण्यावर बसवून तिच्यासाठी डोहाळ्याचे गीत म्हटले जाते छानसा उखाणा तिच्यासाठी घेतला जातो आणि सुवासिनीला बोलावून हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो या मध्ये येणाऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी त्या गर्भवतीला खूप सारे आशीर्वाद दिले जातात तिला आणि तिचा बाळ सुखरूप जन्माला यावं आणि ती सुखी रहावे यासाठी तिला आशीर्वाद रूपाने सुवासिनीला बोलावलं जातं आणि हळदी कुंकू देऊन हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला जातो.