बारसे / Naming Ceremony

नवजात शिशु जन्माला आल्यानंतर अगदी सगळ्यांनाच खूप आनंद होतो मग तो आनंद साजरा करण्यासाठी बाळाचे स्वागत घरी केले जातं. आणि पुन्हा एकदा आईला आणि बाळाला खूप सारे आशीर्वाद मिळावे यासाठी पाहुण्यांना बोलावलं जातं बाळासाठी छान असा पाळणा सजवला जातो पाळणा मध्ये बाळाला ठेवून गाणी म्हणून जो बाळा जो जो जो रे जो अशी गाणी म्हटली जातात आणि बाळाचे नाव ठेवले जाते कुलदीपक मग ती मुलगा असो की मुलगी असो.

कुळाचा कुलदीपक मग ती मुलगी असो की मुलगा असो तिचे स्वागत करून तिचं नाव ठेवल्या जाते आणि तिला खूप सारे आशीर्वाद दिल्या जातात त्याला बारसे / Naming Ceremony असे म्हणतात तेव्हा घोगरा वाटल्या जातात लहान मुलांना बिस्कीट चॉकलेट वाटून आनंद साजरा केला जातो